Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ
Movies : अनेक हिंदी-मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असूनही मनोरंजनसृष्टीला ग्रहण लागलं आहे.
![Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ many Hindi Marathi movies coming to the audience the audience does not go to the theaters to watch the movies Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/02/a120ff3bff19e227f89d4ce49b6b96281659442769_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Movies : जानेवारी महिना सुरू झाला आणि सिनेसृष्टीचे सुगीचे दिवस सुरू झाले. कोरोना काळानंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) सुगीचे दिवस येतील की नाही असे वाटत असताना हिंदी-मराठी सिनेमे (Movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू लागले. त्यामुळे सिनेसृष्टी पुन्हा बहरली. वर्षाच्या सुरुवातीलाच 'झोंबिवली' (Zombivli) आणि 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांमुळे प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळली.
'झोंबिवली' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमानंतर लगेचच 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विवेक अग्निहोत्री एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकीकडे या सिनेमाचे कौतुक होत होते. तर दुसरीकडे या सिनेमावर टीका केली जात होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचे अनेक नेत्यांनी खास शो आयोजित केले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला.
मराठी सिनेमांचा बोलबाला
'द कश्मीर फाईल्स' धुमाकूळ घालत असताना 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमांनी प्रेक्षकांना खुणावलं. तर दुसरीकडे 'पावनखिंड', 'मी वसंतराव', 'शेर शिवराज', 'चंद्रमुखी', 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे', 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांनी चांगलाच धमाका केला. हे मराठी सिनेमे पाहायला मोठ्या प्रमाणात सिनेप्रेक्षक सिनेमागृहात जाताना दिसून आले. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी बहरलेली असतानाच कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'भूल भुलैया 2' हा पहिलाच विनोदी सिनेमा होता. या सिनेमाने जगभरात अनेक रेकॉर्ड केले. प्रेक्षक पुन्हा-पुन्हा हा सिनेमा पाहताना दिसून आले.
मराठीत 'सरसेनापती हंबीरराव' आणि हिंदीत 'भूल भुलैया 2' या सिनेमानंतर अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडले. 'भूल भुलैया 2' नंतर 'जुग जुग जियो', 'सम्राट पृथ्वीराज', 'मेजर', 'शाबास मिथू' असे अनेक हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. तर दुसरीकडे 'वाय', 'अनन्या' आणि 'टाइमपास 3' सारखे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांचं, कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. निर्मात्यांनी प्रमोशनचे नवनविन फंडे आजमावले . पण हे सिनेमे पाहायला प्रेक्षक गेलेच नाहीत. सिनेरसिकांनी या सिनेमांकडे पाठ फिरवली. लवकरच 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' हे मराठी सिनेमे तर 'लाल सिंह चड्ढा' सारखे बहुचर्चित हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या
Marathi Movies : बॉलिवूडच्या बड्या सिनेमांमुळे होत आहे मराठी चित्रपटांची गळचेपी
Movie Release This Week : 'शमशेरा' ते 'अनन्या'; शुक्रवारी प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)