एक्स्प्लोर

Manoj Jarange Movie : मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; अंतरवाली सराटीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' (Sangharshayoddha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगलाही आता सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange Movie : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून कोणताही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने मनोज जरांगे आज (20 जानेवारी 2024) जालन्यातील अंतरवाली सराटीहून मुंबईला रवाना झाले आहेत. दुसरीकडे त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'संघर्षयोद्धा' (Sangharshayoddha) या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'संघर्षयोद्धा' या सिनेमाच्या शूटिंगला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरुवात झाली आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका रोहन पाटील साकारणार आहे. शिवाजी दोलताडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 26  एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rohan Patil (@actor_rohan_patil_1112)

'संघर्षयोद्धा'चं शूटिंग जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू

'संघर्षयोद्धा'च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 

महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी "एक मराठा, लाख मराठा" म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने  दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.  त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

'संघर्षयोद्धा'ची सिनेप्रेक्षकांना उत्सुकता

मनोज जरांगे यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.

संबंधित बातम्या

घरी राहू नका ही शेवटची आर- पारची लढाई, मनोज जरांगेंचे वादळ 9 वाजता मुंबईच्या दिशेनं निघणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
Embed widget