(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरी राहू नका ही शेवटची आर- पारची लढाई, मनोज जरांगेंचे वादळ 9 वाजता मुंबईच्या दिशेनं निघणार
26 तारखेला मुंबईत ताकतीने या, असे आवाहान मराठा बांधवांना मनोज जरांगेंनी केले आहे. उपोषणमुळे शरीर मला साथ देत नाही मात्र तुम्ही एकजूट तुटू देऊ नका, असे देखील जरांगे या वेळी म्हणाले.
जालना: मराठा आरक्षण (Maratha Reservation) कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आज सकाळी 9 वाजता मुंबईकडे (Manoj Jarange Mumbai March) मार्गस्थ होणार आहेत. 26 जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे. आतापर्यंत सरकारनं त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले, मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. तर यापूर्वी सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावणारे आमदार बच्चू कडू हे देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांच्यासोबत मुंबईला निघणार आहे.
आम्हाला मुंबईकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांचा पाठीवर हात ठेवा, मागे राहिलेल्या मराठा समाजाने आपल्या मुलांना पाठिंबा द्यावा. आजवर घडलेला इतिहास सर्व समाजाला माहिती आहे. 26 तारखेला मुंबईत ताकतीने या, असे आवाहान मराठा बांधवांना मनोज जरांगेंनी केले आहे. उपोषणमुळे शरीर मला साथ देत नाही मात्र तुम्ही एकजूट तुटू देऊ नका, असे देखील जरांगे या वेळी म्हणाले.
आम्हाला टोकाचे लढल्याशिवाय पर्याय नाही: मनोज जरांगे
आंतरवालीतून मी उपोषण करतच जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. सर्वाना विश्वासात घेऊन शक्यतो आंतरवालीतून निर्णय घेऊन उपोषण करणार आहे. आम्हाला टोकाचे लढल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील सरकारला दिला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार
मुंबईत जरांगेंसह आंदोलनात सहभागी होण्यासाठी कूच करण्याची तयारी गावागावांत सुरू झालीय. तर मुंबईतलं आंदोलन स्थगित करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.
मनोज जरांगे दौऱ्यासाठी मोठी तयारी
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आलीय. मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये वेगवेगळ्या भागातून आलेले आंदोलक दाखल होऊ लागलेत. तसंच या आंदोलकांसाठी चहा आणि नाश्ताची सोयही करण्यात आली आहे.
अंतरवाली ते मुंबई कसा असेल मार्ग ?
- 20 जानेवारी 2024
सकाळी 9.00 वा- अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस सुरुवात होईल
दुपारी भोजन - कोळगाव ता गेवराई
रात्री मुक्काम - मातोरी ता शिरूर - 21 जानेवारी
दुपारी भोजन - तनपुरवाडी ता पाथर्डी
रात्री मुक्काम - बाराबाभली ( करंजी घाट ) - 22 जानेवारी
दुपारी भोजन - सुपा
रात्री मुक्काम - रांजणगाव ( गणपती ) - 23 जानेवारी
दुपारी भोजन - कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम - चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे - 24 जानेवारी
पुणे शहर प्रवास - जगताप डेअरी - डांगे चौक - चिंचवड - देहूफाटा
रात्री मुक्काम - लोणावळा - 25 जानेवारी
दुपारी भोजन - पनवेल
रात्री मुक्कामी - वाशी - 26 जानेवारी
चेंबूरवरून पदयात्रा -
आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क
मुंबईत हे आंदोलन होणार हे जवळपास नक्की झालंय. आता सरकार हा अवघड पेपर कसा सोडवतं याची उत्सुकता राज्याला आहे.
हे ही वाचा: