"मी 23 वर्षे अडल्ड फिल्म...", 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने सत्य केलं कबूल; वक्तव्याने एकच खळबळ
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्रीचे सत्य कबूल करत सांगितलं की, ती नवरात्रीमध्ये दोन पेग घ्यायची. तिच्या या वक्तव्यानंतर आता खळबळ माजली आहे.

Entertainment News : महाकुंभ मेळ्यात अनेक साधुसंत पोहोचले असताना, त्यातील काही चांगलेच चर्चेत आले आहेत. यातच एक अभिनेत्री सुद्धा प्रकाशझोतात आली आहे. बॉलिवूडला राम-राम ठोकून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी महाकुंभमुळे पुन्हा चर्चेत आली. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच ही पदवी तिच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर ममता कुलकर्णी चर्चेत आली आहे. आता ममता कुलकर्णीची मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. ममताने एका मुलाखतीत सत्य मान्य करत सांगितलं की, ती नवरात्रीमध्ये दोन पेग घ्यायची. याशिवाय तिने अडल्ड चित्रपटांबद्दलही वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर आता खळबळ माजली आहे.
ममता कुलकर्णीच्या वक्तव्याने खळबळ
ममता कुलकर्णीला 2025 च्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर ही पदवी दिली. मात्र, अनेक धार्मिक पुढाऱ्यांच्या विरोधामुळे ही पदवी तिच्याकडून काढून घेण्यात आली. महामंडलेशवर म्हणून ममता कुलकर्णीचा कार्यकाळ अवघ्या सात दिवसांचा होता. यानंतर अभिनेत्रीने मीडियाला मुलाखत देत स्वत:ची बाजू मांडत विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णीने 'आप की अदालत' कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगडली आहेत.
मलिन प्रतिमेमुळे आणि वादांमुळे आखाड्यातून बाहेर
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले पण नंतर 7 दिवसांतच त्यांच्याकडून ही पदवी काढून घेण्यात आली. तिला आखाड्यामधून बाहेर काढण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. तिच्या मलिन प्रतिमेमुळे आणि वादांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.
"23 वर्षे अडल्ड फिल्म..."
मुलाखतीत ममता कुलकर्णीने आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितलं. तिने स्वतःबद्दल अनेक खुलासे केले, जे लोकांना अद्याप कुणालाही माहित नाहीत. ममता कुलकर्णी म्हणाली की, तिने गेल्या 23 वर्षांपासून कोणताही अडल्ट चित्रपट पाहिलेला नाही. तिने पुढे सांगितलं की, ती नवरात्रीत दोन पेग प्यायची.
"मी मंदिर माझ्यासोबत घेऊन फिरायचे"
ममता कुलकर्णीने सांगितलं की म्हणाली, बॉलिवूडच्या काळात, माझे गुरु 1997 मध्ये माझ्या आयुष्यात आले. जेव्हा जेव्हा मी शूटिंगसाठी जायचो तेव्हा मी तीन बॅग घेऊन जायचे. एकात माझे कपडे असायचे, तर दुसऱ्यात पोर्टेबल मंदिर असायचं. हे मंदिर माझ्या खोलीत एका टेबलावर ठेवायचे आणि कामावर जाण्यापूर्वी पूजा करायचे. माझे विधी पूर्ण केल्यानंतरच मी माझ्या शूटिंगसाठी जायचे."
दिवसा उपवास, रात्री दोन पेग
ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, यावेळी तिच्या डिझायनरनेही तिला फटकारले होतं की, तू याबाबतीत खूप गंभीर होत आहेस. नवरात्रीत ती दिवसा ध्यान करायची आणि उपवास करायची, पण रात्री दोन पेग स्कॉच प्यायची. तिने सांगितलं की, "यानंतर मला ताबडतोब वॉशरूमला जावं लागायचं. मला असं वाटायचं की, माझ्या आतमध्ये सगळं जळत आहे. मी 40 मिनिटे वॉशरूममध्येच बसून राहायचे".
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Udit Narayan : पहिल्या पत्नीला धोका देत गुपचूप उरकलं दुसरं लग्न, आदित्यची आई दिपा आहे दुसरी पत्नी; वाचा गायकाची फिल्मी स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

