एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahesh Kothare: महेश कोठारे यांच्या 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

'डॅम ईट आणि बरंच काही' हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा सांगणारं 'डॅम ईट आणि बरंच काही' हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात गीत-संगीतांच्या सुरावटीवर आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या 'डॅम ईट आणि बरंच काही' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महेश कोठारे, मेहता पब्लिकेशनचे अखिल मेहता, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे, पुस्तकाचे लेखक-पत्रकार-तारांगणचे संपादक मंदार जोशी उपस्थित होते. याखेरीज किरण शांताराम, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळीही हजर होती. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन केले. 
 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश कोठारे यांचा 'धुमधडाका' प्रदर्शित झाला तेव्हा मी दहावीत शिकत होतो. मी नागपूरचा असल्याने तिकडे सिनेमे थोडे उशीरा पहायला मिळायचे. 'धुमधडाका' या चित्रपटासोबतच कोठारे यांच्या सर्वच चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवली. महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सिनेमाचा गोडवा लागला. मराठी सिनेमाचा कायापालट करून नवी पिढीला जोडण्याचे काम महेश कोठरेनी केले आहे. मंदार जोशी यांनी त्यांचे सुरेख चरित्र लिहिले आहे. 'डॅम इट'चा जन्म कसा झाला हेदेखील या पुस्तकात वाचायला मिळाले. पुस्तक हातात घेतल्यावर लगेच त्यातील बराचसा भाग वाचून काढला. उत्सुकता वाढवणारे हे पुस्तक वाचताना खाली ठेवूच नये असे वाटते. या पुस्तकात कोठारेंनी आपल्या वेदनाही मांडल्या आहेत. कोठारेंनी प्रोफेशनलीझमला खुप महत्व दिले. नवीन लोकांसोबत काम करताना जुन्या कलाकारांसोबतचे संबंधही अबाधित राखले. यशाचे शिखर गाठताना अपयशही पाहिले. मराठीला नवनवीन गोष्टी दिल्या. ते मराठीतील वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक आहेत. मालिका विश्वातही त्यांचे कार्य मोलाचे आहे. कोठारे यांचे मनोरंजन विश्वातील योगदान अतुलनीय आहे. कोठारेंनी मराठीत नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

'डॅम इट आणि बरंच काही'च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिले याचा खूप खूप आनंद आहे. देवेंद्रजींचा ऋणी आहे. या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आण संघर्ष आहे. माझ्या आयुष्यात एक भयंक काळ होता. त्या काळातही काही लोकं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तीसुद्धा आज इथे हजर आहेत. किशोर अग्रहाळकर, लंडनमधील साजीद शेख, मच्छिंद्र चाटेसर असे अनेक लोक आहेत, जे त्यावेळी माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून महेश कोठारे आज हे पुस्तक घेऊन तुमच्यासमोर येऊ शकला. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. त्यासाठीच हे पुस्तक लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. 

'डॅम इट आणि बरंच काही' या पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून कोठारेंच्याआड दडलेला स्टारडममधील माणूस पाहता आल्याचे अखिल मेहता म्हणाले. कोठारे यांच्याशी जोडण्याचा प्रवास मंदार जोशी यांनी सांगितला. महेश कोठरेंनी आपल्या यशस्वी प्रवासासोबत चुकांची कबुलीही या पुस्तकात दिली आहे. चार महिने मारलेल्या गप्पामधून उलगडलेले कोठारे यात आहेत. 'धुमधडाका' सिनेमावर ४० पाने आहेत. महेश आणि सचिन पिळगावकर यांच्या आठवणी या निमित्ताने जागवण्यात आल्या. 

सचिन पिळगावकर, महेश कोठारे, निवेदिता सराफ आणि आदिनाथ कोठारे यांचा गप्पांचा फडही या सोहळ्यात रंगला. निवेदिता यांनी कोठारेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण त्यासोबतच पुस्तकातील काही किस्सेही वाचून दाखवले. सचिन पिळगावकर म्हणाले की, समोर स्पर्धा करणारी व्यक्ती नसेल तर स्पर्धा होऊ शकत नाही. स्वतःची वेगळी शैली असलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही मनात आपुलकी असते. ती नेहमीच महेशबाबत वाटली. आम्ही कायम पडद्यामागे खूप चांगले मित्र राहिलो आहोत. लोकांना आम्ही प्रतिस्पर्धी असल्याचा आनंद मिळायचा पण आम्ही मात्र आपापल्या चित्रपटांच्या सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली होण्याचा आनंद साजरा करायचो. माझ्या यशात महेश सामील व्हायचा आणि त्याच्या आनंदात मी नेहमी सहभागी व्हायचो.

गजमुखा करतो जयजयकार... या गाण्याने पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी..., चिकी चिकी बुबुम बुम..., ही दोस्ती तुटायची नाय... ही कोठारेंची गाजलेली गाणी सादर करण्यात आली. कुबड्या खविस, टकलू हैवान, तात्या विंचू, कवठ्या महांकाळ हे कोठारेंच्या सिनेमातील खलनायकही अवतरले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आदीनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि रोहित हळदीकर यांनी केले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा; 15 जानेवारीला मालिकेचा महाएपिसोड

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझाEknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
Bollywood Richest Star Kid: ना सुहाना, ना सारा... बॉलिवूडमध्ये पदार्पण न करूनही 'हा' इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत स्टारकीड
ना सुहाना, ना सारा... बॉलिवूडमध्ये पदार्पण न करूनही 'हा' इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत स्टारकीड
Embed widget