Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा; 15 जानेवारीला मालिकेचा महाएपिसोड
Marathi Serial : 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत सध्या अनपेक्षित वळणं येत आहेत.
![Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा; 15 जानेवारीला मालिकेचा महाएपिसोड Tumchi Mulgi Kay Karte Thrilling week of Tumchi Mulgi Kay Karte marathi serial Mahaepisode of the serial on 15th January Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा; 15 जानेवारीला मालिकेचा महाएपिसोड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/8fd9cb15b0e5182d47e97a26e7578de81673438332386254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे.
वेगळ्या धाटणीची आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका होय. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेता घेता मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतली रंजकता कायम राहिली.
View this post on Instagram
'तुमची मुलगी काय करते' ही मालिका आता शेवटापर्यंत येऊन पोचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे. प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
'तुमची मुलगी काय करते' या मालिकेचा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला होणार आहे. रविवारी रात्री 10 वाजता प्रेक्षक हा महाएपिसोड सोनी मराठीवर पाहू शकतात. मालिका शेवटापर्यंत आली असल्याने आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचीदेखील चर्चा आहे.
संबंधित बातम्या
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' आता बंगाली भाषेत डब होणार; मालिका उत्कंठावर्धक वळणावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)