Maharashtra Television News : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ते 'आई कुठे काय करते !' तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' मालिका घेणार प्रेक्षकांना निरोप; 'हा' कार्यक्रम होणार सुरू
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte: संजनाच्या कामामुळे अनिरुद्धची होतेय चिडचिड; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. 'आई कुठे काय करते !' या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिषेकचा अपघात झाला आहे. त्याच्या अपघातामुळे देशमुख कुटुंब चिंतेत आहे. अशातच संजनाला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serial : 'फुलाला सुगंध मातीचा' ते 'मुलगी झाली हो'; छोटा पडदा गाजवणाऱ्या मालिका आता पुन्हा पाहा
Marathi Serial Latest Update : सिनेमे (Movies), नाटक (Drama), वेबसीरिज (Web Series) अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत असलं तरी मालिकांची जागा कोणतं प्लॅटफॉर्म घेऊ शकलं नाही. मालिकाप्रेमी आजही त्यांच्या आवडीच्या मालिका न चुकता पाहतात. आजवर अनेक मालिकांनी छोटा पडदा गाजवला आहे. आता 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) आणि 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या छोट्या पडदा गाजवणाऱ्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Maharashtrachi Kitchen Queen: "सुगरणींनो, पदर खोचून तयार रहा"; 'महाराष्ट्राची किचन क्वीन' कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Maharashtrachi Kitchen Queen: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे. या कार्यक्रमचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संकर्षण 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाची माहिती प्रेक्षकांना देत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा