Marathi Serial : 'फुलाला सुंगध मातीचा' ते 'मुलगी झाली हो'; छोटा पडदा गाजवणाऱ्या मालिका आता पुन्हा पाहा
Marathi Serial : 'फुलाला सुंगध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' या छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
Marathi Serial Latest Update : सिनेमे (Movies), नाटक (Drama), वेबसीरिज (Web Series) अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत असलं तरी मालिकांची जागा कोणतं प्लॅटफॉर्म घेऊ शकलं नाही. मालिकाप्रेमी आजही त्यांच्या आवडीच्या मालिका न चुकता पाहतात. आजवर अनेक मालिकांनी छोटा पडदा गाजवला आहे. आता 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) आणि 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या छोट्या पडदा गाजवणाऱ्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल डोस
'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहेत. टीआरपीच्या शर्यतीत या दोन्ही मालिका पहिल्या दहात होत्या. या मालिकांचा टीआरपी लक्षात घेता वाहिनीने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडत्या या मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या तीनमध्ये होती. समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. समृद्धीने या मालिकेत कीर्तीची भूमिका साकारली होती. तर हर्षद या मालिकेत शूभमच्या भूमिकेत दिसला होता. समृद्धी आणि हर्षदची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सामाजिक विषयाला हात घालणारी 'मुलगी झाली हो' ही मालिका घराघरांत पाहिली जात होत. साजिरीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती.
View this post on Instagram
मुलगी होण्याचा आणि असल्याचा अभिमान दर्शवणारी 'मुलगी झाली हो' ही हृदयस्पर्शी मालिका आणि जोडीदार योग्य असेल तर काहीच अशक्य नाही हे सिद्ध करणारी 'फुलाला सुगंध मातीचा' ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा या दोन्ही मालिका प्रेक्षक पाहू शकतात.
'मुलगी झाली हो' आणि 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेआधी 'पुढचं पाऊल', 'देवयानी' आणि 'महामानवाची गौरवगाथा' या लोकप्रिय मालिकादेखील पुन्हा दाखवण्यात आल्या होत्या. त्यावेळी मालिकाप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' या मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या