एक्स्प्लोर

Tendlya : राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'तेंडल्या' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवणारा सिनेमा

Tendlya : 'तेंडल्या' हा सत्य घटनांवर आधारित असलेला मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tendlya Marathi Movie : 'सचिन' म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि 'सचिन...सचिन...'चा तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. सचिनच्या या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्यानेदेखील सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहिलं. सचिनप्रमाणेच सचिन जाधव (Sachin Jadhav) या चाहत्याचंदेखील स्वप्न साकार झालं आहे. सचिन जाधवचा 'तेंडल्या' (Tendlya) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

गावाकडच्या मंडळींसाठी क्रिकेट हा खेळ किती महत्त्वाचा आहे? त्यांचं या खेळावर किती प्रेम आहे? सचिन तेंडुलकर त्यांच्यासाठी कसा प्रेरणादायी आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा 'तेंडल्या' हा सिनेमा आहे. 'तेंडल्या' या सिनेमाची झलक आता समोर आली आहे. सचिन तेंडुलकरचा नुकताच वाढदिवस झाला असून 'तेंडल्या' या सिनेमाचा सर्वेसर्वा सचिन जाधवने त्याला या सिनेमाची भेट दिली आहे. 

'तेंडल्या' कधी होणार प्रदर्शित? (Tendlya Release Date)

'तेंडल्या' हा मराठी सिनेमा येत्या 5 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तेंडल्या' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. सचिन तेडुंलकरनेदेखील या सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे. 

'तेंडल्या' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सचिन जाधव आणि नचिकेत वायकरने सांभाळली आहे. 'अश्वमेध मोशन पिक्चर्स'च्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. 'तेंडल्या' हा सिनेमा आधी 24 एप्रिल 2020 रोजी सचिनच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आल्याने सिनेप्रेमींसह क्रिकेटप्रेमीदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. 

नवोदित कलाकारांना 'तेंडल्या'ने दिली संधी

'तेंडल्या' या सिनेमात अनेक नवोदित कलाकार आहेत. या सिनेमात 'पोप्या'च्या भूमिकेत ओंकार गायकवाड, 'इंजान'च्या भूमिकेत स्वप्नील पाडळकर, 'बारका आज्या'च्या भूमिकेत राज कोळी, हर्षद केसरेला 'जॉनट्यां', महेश जाधव 'जयसूर्या'च्या आणि आकाश तिकोटीला डीपीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

गेल्या सहा वर्षांपूर्वी इस्लामपूर जवळील एका खेड्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत उपलब्ध साधनांच्या आधारे 'तेंडल्या' या सिनेमाची निर्मिती केली आहे. आर्थिक अडचणींमुळे या सिनेमाचं प्रमोशन न करता आल्याने हा सिनेमा प्रदर्शनापासून रखडला होता. 

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा : सहा पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर, 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Election Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Embed widget