Maharashtrachi Kitchen Queen: "सुगरणींनो, पदर खोचून तयार रहा"; 'महाराष्ट्राची किचन क्वीन' कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Maharashtrachi Kitchen Queen: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे. या कार्यक्रमचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संकर्षण 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाची माहिती प्रेक्षकांना देत आहे.
'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की संकर्षण म्हणतो, 'स्वयंपाकघरात न थकता राबत असते. स्वत: असते उपाशी, तरीही आपलं पोट भरत असते. आता तिचं कौतुक जगभरात होणार'. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' कार्यक्रमाच्या या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रेक्षक आता 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कुकिंग शोची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
'महाराष्ट्राची किचन क्वीन' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाच्या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, 'सुगरणींनो, पदर खोचून तयार रहा...कारण घेऊन आलोय 'महाराष्ट्राची किचन क्वीन'...!' हा कार्यक्रम 15 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोमवार ते शनिवार दुपारी 1 वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम बघता येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुगरणींना आपली पाककला प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
माझी तुझी रेशिमगाठ, खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये संकर्षणनं काम केलं. तसेच त्यानं वेडिंग चा शिनेमा या चित्रपटात देखील संकर्षणनं काम केलं आहे. 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाचं संकर्षणनं सूत्रसंचालन केलं होतं. संकर्षण हा सध्या “नियम व अटी लागू…” या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकामधील संकर्षणच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. “नियम व अटी लागू…” या नाटकाचे निर्माते प्रशांत दामले आहेत, तर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या'मध्ये येणार सचिन; रंगणार 'तेंडल्या' विशेष भाग