सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाला थेट बॉलिवुडमधून ऑफर, माळा विकणारी तरुणी आता थेट हिरोईन होणार!
Viral Girl Monalisa : कुंभमेळ्यात व्हायरल झालेली सुंदर डोळ्यांची मोनालिसा नावाची तरुणी आता थेट एका चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे.
Viral Girl Monalisa : कुंभमेळ्यात रुद्राक्षाची माळा विकणारी मोनालिसा (Monalisa Viral Girl) ही सुंदर डोळ्यांची तरुणी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मोनालिसाचे सौंदर्य पाहून अनेकजण भारावले आहेत.दरम्यान, आता याच मोनालिसाला बॉलिवुडमध्ये थेट अभिनेत्री बनण्याची संधी चालून आली आहे. तिला मोठ्या दिग्दर्शकाने हिरोईन बनण्याची थेट ऑफरच देऊन टाकली आहे.
व्हायरल झाल्याने माळा विकण्यास अडचण
कुंभमेळ्यात मोनालिसा नावाची ही तरुणी वेगवेगळ्या प्रकारची रुद्राक्षांची माळा विकत होती. तिचे कुठेही एखादे दुकान वगैरे नव्हते. ती उन्हातान्हात तिचा व्यावसाय करत होती. मात्र अचानक इंटरनेटवर तिचा व्हिडीओ आला. या व्हिडीओत तिचे सुंदर डोळे दाखवण्यात आले होते. त्यामुळेच तिच्या सौंदर्याच्या अनेकजण प्रेमात पडले होते. पाहता पाहता ही तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. प्रत्येकजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होता. म्हणूनच तिला तिचा व्यवसाय करण्यास अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे या प्रसिद्धीला तिदेखील चांगलीच कंटाळली होती. परिणामी तिने महाकुंभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ती खरगोन जिल्ह्यातील तिच्या महेश्वर गावात पोहोचली आहे. माझी प्रकृती बिघडली असून लवकरच मी महाकुंभात परतेन असं तिनं सांगितलं आहे.
View this post on Instagram
मोनालिसा कोणत्या चित्रपटात दिसणार?
दरम्यान, दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिला महत्त्वाची भूमिका दिली जाणार आहे. 'द डायरी ऑफ मणिूपर' या चित्रपटात ती एका निवृत्त सैन्याधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका करणार आहे. शूटिंग चालू होण्याआधी तीन महिने मुंबईत तिला अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबीयांनीही तिला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही सुंदर डोळ्यांची मोनालिसा आता अभिनेत्री म्हणून चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा :
Sharvari wagh :मराठमोळ्या शर्वरी वाघचा खास लूक, काळ्या रंगाच्या साडीत दिसतेय खास!
सब्यसाची मुखर्जीच्या पार्टीसाठी आलिया भट्टचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!