Poonam Panday Going to Mahakumbh: पूनम पांडे महाकुंभात शाही स्नान करणार; परत येऊन सर्वांना प्रसादही देणार
Poonam Panday Going to Mahakumbh: बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी गेली आहे. तसेच, तिनं परत येऊन सर्वांना प्रसाद देणार असल्याचंही म्हटलं आहे.
Poonam Panday Going to Mahakumbh: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल असलेली पूनम पांडे (Poonam Panday) तिचा लूक आणि आगळ्या वेगळ्या स्टाईल स्टेटमेंटसोबत तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशातच अलिकडेच तिनं तिच्या अचानक निधनाच्या बातमीनं चाहत्यांना धक्का दिला होता. पण, काही वेळानं तिनं समोर येऊन ती जिवंत असल्याचं जाहीर केलं आणि फक्त जाहीरातीचा भाग म्हणून ती अफवा पसरवल्याचंही स्पष्ट केलं. पण त्यानंतर मात्र, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. ज्यासाठी पूनम पांडेने माफीही मागितली होती. अशातच आता पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे, ते तिनं पॅपाराजींसमोर केलेल्या एका वक्तव्यामुळे.
पूनम पांडे महाकुंभात स्नान करणार
अलिकडेच बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडे पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी पूनम पांडे कॅज्युअल लूकमध्ये दिसली. त्यावेळी पूनम पांडेला पॅपाराझींनी कुठे निघालात अशी विचारणा केल्यावर तिनं सांगितलं की, ती महाकुंभात स्नान करण्यासाठी जात आहे. तसेच, परत येऊन ती सर्वांना प्रसाद देईल, असंही तिनं सांगून टाकलं. आता पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा पूनम पांडेवर टीकेची झोड उठवली आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांकडून टीकेची झोड
मॉडेल पूनम पांडे महाकुंभ मेळाव्याला जात असल्याचं समजताच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ती महाकुंभला जात असल्याचं समजताच, काही लोकांनी तिचं समर्थन केलं आहे. तर, काहीजण पूनम पांडेला ट्रोल करत आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, पूनम पांडे कितीही मॉर्डन असली तरी ती कुंभमेळ्याला जाऊन स्नान करणार आहे, ही मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, बरं, हे चांगलं झालं, आता तू सनी लिओन आणि मिया खलिफा यांनासुद्धा सोबत घेऊन जा. तिसऱ्या एका युजरनं लिहिलं की, राम तेरी गंगा मैली हो गई... दरम्यान, आता नेटकऱ्यांना पूनम पांडेच्या महाकुंभ मेळाव्याला उपस्थित असल्याच्या फोटोंची प्रतिक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :