Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मुलांना राहायचंय प्रसिद्धीपासून दूर, पापाराझींना टाळण्यासाठी अरिन आणि रायनची खास युक्ती
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. त्यासाठी अरिन आणि रायन यांनी खास युक्तीही काढली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीनेच याबाबत माहिती दिलीआहे.
Madhuri Dixit : सेलिब्रेटींची मुले आपोआप प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. परंतु, अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. त्यासाठी अरिन आणि रायन यांनी खास युक्तीही काढली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीनेच याबाबत माहिती दिलीआहे.
प्रदीर्घ काळापासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या माधुरीला कॅमेऱ्यांमध्ये रहायला आवडते. परंतु, याउलट तिच्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. माधुरीने तिच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. अरिन आणि रायनला माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या नजरेत येऊ नये असे वाटते. त्यामुळे हे दोघे अनेक युक्त्या शोधून काढत असतात. दोघेही कारमध्ये कसे लपून बसतात? आणि मीडियापासून स्वतःला कसे वाचवतात? याबाबत माधुरीने सांगितले आहे.
माधुरीने सांगितले की, माझ्या मुलांना इच्छाशक्तीपासून कधीच लपवत नाही. परंतु, त्यांना हवे असते तेव्हाच ते स्वतः पुढे येतात. आम्ही चित्रपट पाहण्यासाठी किंवा बाहेर कोठे जातो, त्यावेळी पापाराझी आपला कॅमेरा घेऊन तयार असतात. परंतु, या पापाराझींना कसा चकमा द्यायचा हे माझ्या मुलाला चांगले माहीत आहे. दोघेही आधीच येऊन गाडीत येऊन बसतात. आम्ही बाहेर थिएटरमधून बाहेर पडायच्या आधीच ते गाडीत बसलेले असतात.
"आता दोन्ही मुले मोठी झाली आहेत. त्यांना आता सर्व गोष्टी समत आहेत. मी भारतात परत आले त्यावळी दोघेही खूप लहान होते. एक सहा तर दुसरा आठ वर्षांचा होता. त्यामुळे यापूर्वी कधी त्यांनी अशा गोष्टी अनुभवल्या नव्हत्या." असे माधुरीने मुलाखतीमध्ये सांगितले. दरम्यान, माधुरी दीक्षित सध्या 'द फेम गेम' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. सध्या ती या वेब सिरीजचे प्रमोशन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!
- Priyanka Chopra : प्रियांकाच्या आईने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, निक जोनासच्या वडिलांनी केली कमेंट
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित