एक्स्प्लोर

Oscar वाल्यांना धर्मेंद्रंचा पडला विसर; हेमा मालिनींना राग अनावर, मोठी लेकही म्हणाली...

Dharmendra Ignored at Academy Awards: ऑस्कर सोहळ्याच्या श्रध्दांजली यादीत धर्मेंद्र यांचे नाव नव्हते. या प्रकरणावर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी प्रतिक्रिया दिली.

No Tribute to Dharmendra at Oscars: 15 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये 98 वा अकादमी पुरस्कार अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात अनेक चित्रपट आणि कलाकारांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरातील दिग्गज कलाकारांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते.  दरम्यान, भारतीय या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याशी प्रचंड नाराज झाले आहेत. खरंतर  2026 च्या  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत कलाकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती. परंतु, या लिस्टमध्ये दिग्गज भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांचं नाव नव्हते.  मात्र, आता या प्रकरणावर धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

24 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना 2026 चा प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला. दरम्यान, 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही त्यांना श्रध्दांजली वाहिली जाईल, अशी अपेक्षा भारतीयांना होती.  मात्र, तसं घडलं नाही. या कारणामुळे इंटरनेटवर भारतीयांनी या सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली.  दरम्यान, असंख्य प्रतिक्रिया उमटत असताना, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी  आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणाबाबत मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, 'ही खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे.  जगभरातील असंख्य लोकांवर ज्याचा प्रभाव आहे, त्या अभिनेत्याला दुर्लक्षित करणं खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. धर्मेंद्र हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे कलाकार आहेत.  त्यांना कारकिर्दीत बरेच पुरस्कार मिळाले नाही.  मग त्यांनी ऑस्कर पुरस्काराची पर्वा  का करावी? आम्हाला भारतीयांकडून इतकं प्रेम मिळतंय याचा आम्हा दोघांना आनंद आहे.   मात्र, पुरस्कार  नेहमीच त्यांच्यापासून दूर राहिले आहे', अशी भावना हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मला नाही वाटत नाही की त्यांना कोणताही फरक पडला असता. त्यांचं मन आणि ह्रदय खूप मोठे आहे. ते अशा  गोष्टींची चिंता करत नाहीत, पर्वा करत नाहीत.  त्यांच्यासाठी आयुष्य  हे कधीही नाव किंवा प्रसिद्धी, प्रतिष्ठेपुरते मर्यादित राहिले नाही. तर,  प्रेम, दयाळूपणा आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याबद्दल होते', असं अभिनेत्री म्हणाली. 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget