(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laal Singh Chaddha : देशात फ्लॉप विदेशात हिट; 'लाल सिंह चड्ढा'ने जगभरात केली 125 कोटींची कमाई
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'ने जगभरात 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Laal Singh Chaddha : मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपली जादू दाखवण्यात कमी पडला असला तरी विदेशात हा सिनेमा हिट ठरतो आहे. जगभरात या सिनेमाने 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा भारतात फ्लॉप ठरला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 59 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडल्याने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मनेदेखील सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरतो आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 125.83 कोटींची कमाई केली आहे. पण तरीही या सिनेमाचे कलेक्शन निराशाजनक आहे.
आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा चीनमधील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता. त्यावेळी या सिनेमाने हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा आता चीनमध्ये प्रदर्शित झाला तर आणखी चांगली कमाई करू शकेल असे म्हटले जात आहे. चीनमध्ये बॉलिवूडची लोकप्रियता वाढत असून आमिर खान हा चीनमधील लोकांचा आवडता अभिनेता आहे. त्यामुळे ते त्याच्या सिनेमाला पसंती दर्शवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आमिरसह या सिनेमात करीना कपूर, मनो सिंह, नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर 60 कोटींचा गल्ला जमवू शकतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या