(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Second Weekend Collection : 'लाल सिंह चड्ढा' अन् 'रक्षाबंधन' दोन्ही सिनेमे सुपरफ्लॉप; बॉक्स ऑफिसवर जादू फेल
Movies : 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' हे सिनेमे सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत.
Laal Singh Chaddha Raksha Bandhan Box Office Collection : सध्या अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) पासून अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) सिनेमापर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' हे दोन्ही बिग बजेट सिनेमा असून बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले आहेत.
'लाल सिंह चड्ढा'ने केली 55 कोटींची कमाई
आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने 4.65 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 55 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडल्याने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मनेदेखील सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.
View this post on Instagram
'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींची गल्ला जमवला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'रक्षाबंधन'ने केली 41.60 कोटींची कमाई
अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने चार कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 41.60 कोटींची कमाई केली आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 60 कोटी तर 'रक्षाबंधन' 45-46 कोटींचा गल्ला जमवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.