Santosh Juvekar : एक हड्डी सात तुकडे... संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला,"आयच्या गावात..."
Kuttye : संतोष जुवेकरचा आगामी 'कुत्ते' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Santosh Juvekar : एक हड्डी सात तुकडे... संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला, Kuttye Santosh Juvekar upcoming movie Kuttye is going to hit the screens soon Santosh Juvekar : एक हड्डी सात तुकडे... संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/ae7d4aa6020b0ad262ddc1b0fdb29b3b1671427726971254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संतोषचा आगामी 'कुत्ते' (Kuttye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.
संतोषने लिहिलं आहे,"मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका 'कुत्ते'. खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक सत्यात उतरलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न ऑडिशन न देता पूर्ण झालं आहे".
संतोषने पुढे लिहिलं आहे,"कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा 2021 साली फोन आला. तेव्हा मी त्यांना विचारलं ऑडिशन द्यायला कधी येऊ? यावर ते म्हणाले,विशाल सरांनी स्वत: तुला घ्यावं असा आग्रह केला आहे. आयच्या गावात अजून काय पाहिजे राव. माझ्या या स्वप्नांसाठी तुमच्या शुभेच्छा, तुमची साथ आणि बाप्पाचा आशिर्वाद कायम हवा. अजून खूप काही आश्चर्याचे आनंदी धक्के मला या सिनेमामुळे मिळाले आहेत. लवकरच शेअर करेन". संतोषच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
'कुत्ते' 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
'कुत्ते' हा सिनेमा 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठमोळ्या संतोषसह अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह हे कलाकार झळकणार आहेत. संतोषच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आजवर संतोष 'मोरया', 'झेंडा, 'पोलीस लाइन', 'एक तारा', '36 गुण' या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
संबंधित बातम्या
36 Gunn : आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’; 4 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)