एक्स्प्लोर

36 Gunn : आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’; 4 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात

36 Gunn Marathi Movie : लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची 'मतं' आणि 'मन' जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे.

36 Gunn Marathi Movie : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 'लग्न' ही फार महत्वाची गोष्ट असते. दोन व्यक्तींना, कुटुंबांना त्याचबरोबर जबाबदाऱ्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा काळ असतो. पण त्याचबरोबर लग्न प्रक्रियेत लग्नपत्रिकेलाही तितकेच महत्त्व दिले जाते. मात्र, घरदार, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘36 गुण’ (36 Gunn) जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेला ‘36 गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांची मुख्य भूमिका असलेल्या ’36 गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत.

आजच्या पिढीची गोष्ट सांगणारा चित्रपट : 

कुटुंबाच्या आशीर्वादाने, रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्या नात्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं? याची मनोरंजक तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे '36 गुण' हा चित्रपट.

लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची मतं आणि मन जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. त्याचबरोबर आजच्या पिढीतील लग्न झालेल्या आणि न झालेल्या तरूण पिढीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

‘मान मरताब, पगड़ी फेटे रेमंडवाला सूट रे 36 गुण’ हे धमालबाजाचं आणि ‘दुरावा दलदल’ हे अतिशय भावस्पर्शी अशी दोन सुमधुर गाणी या चित्रपटात आहेत. हर्षवर्धन वावरे, जयदीप वैद्य, कीर्ती किल्लेदार यांचा स्वरसाज या गाण्यांना लाभला आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ आणि ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘36 गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Dipti Lele : मराठमोळी अभिनेत्री दीप्ती लेलेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' चित्रपटातून झळकणार मोठ्या पडद्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget