Nitesh Rane vs Sanjay Raut : संजय राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत होते, नितेश राणेंचा दावा
भांडुपमध्ये बसून संजय राजाराम राऊत यांना मंगेरी लाल के हसीन सपने पडत होते. संजय राजाराम राऊत यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य सांगावे, उद्धव ठाकरेंच्या नावाला मोठा विरोध हा संजय राऊतचा होता. ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसे करता हे तुम्ही शरद पवार यांना विचारले नव्हते का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. काय म्हणाले राणे पाहा व्हिडिओ..
हे देखील पाहा
J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय