Mumbai Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेतून खासदार निवडण्याची वेळ आता आलीये. उद्या या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. सतराशे पन्नास मतदान केंद्राकडे ईव्हीएम मशीन रवाना झाल्या आहेत. आता सतरा लाख पन्नास हजारांहून अधिक मतदारांना रवींद्र वायकर, अमोल कीर्तिकर यांसह अपक्ष उमेदवारांपैकी एकाला खासदार म्हणून निवडायचं आहे. त्यासाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे. लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू असताना आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.
हे व्हिडिओ देखील पाहा
J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय