Koffee with Karan 8: "करण आम्ही इथे 'शुद्धी' करण्यासाठी आलोय"; कॉफी विथ करणमध्ये विकीचं वक्तव्य, तर कियारानं सांगितले 'हे' सिक्रेट्स
Koffee with Karan 8: कॉफी विथ करणचा प्रोमो करण जोहरनं (Karan Johar) शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत.
![Koffee with Karan 8: Koffee with Karan 8 Kiara Advani says Sidharth proposed to her in Rome Vicky Kaushal reveals what Katrina calls him promo viral Koffee with Karan 8:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/569e833fa521eb3e83709872056835f21701682519290259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Koffee with Karan 8: गेल्या काही दिवसांपासून कॉफी विथ करण (Koffee with Karan) या कार्यक्रमाचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत कॉफी विथ करण-8 चे (Koffee with Karan 8) एकूण सहा एपिसोड रिलीज करण्यात आले आहेत. आता या कार्यक्रमाचा सातवा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला येणार आहेत. नुकताच कॉफी विथ करणचा एक प्रोमो करण जोहरनं (Karan Johar) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे वेगवेगळे मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत.
कॉफी विथ करण-8 च्या प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, करण हा विकी आणि कियारा यांचे शोमध्ये स्वागत करतो. त्यानंतर विकी करणला म्हणतो, "करण आम्ही इथे 'शुद्धी' करण्यासाठी आलोय" . त्यानंतर कियारा आणि विकी हे अनेक विषयांवर चर्चा करतात. तसेच कियारा ही तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक सिक्रेट्स कॉफी विथ करण-8 च्या प्रोमोमध्ये सांगताना दिसत आहे.
कॉफी विथ करण-8 च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कियारा करणला तिच्या आणि सिद्धार्थच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगते. ती म्हणते, की रोममधून आल्यानंतर सिद्धार्थनं तिला प्रपोज केलं होतं. तसेच एका गेम राऊंडमध्ये करण विकीला विचारतो की, "कतरिना ही कोणत्या नावानं तुला हाक मारते?". विकी याचं मजेशीर उत्तर देतो.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
विकी आणि कियाराचे चित्रपट
'सॅम बहादूर' हा विकी कौशलचा चित्रपट काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकीने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. तसेच कियारा अडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. कियारा ही आता लवकरच 'गेम चेंजर' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती राम चरणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)