एक्स्प्लोर
सलमान आणि हृतिकमध्ये 'या' अभिनेत्रीवरुन कोल्डवॉर?
मुंबई : 'कितने अजीब रिश्ते है यहाँ पे', 'पेज3' सिनेमातील हे शब्द बॉलिवूडला अगदी तंतोतंत लागू होतात. आज गळ्यात गळे घालणारे कलाकार उद्या एकमेकांविषयी गरळ ओकताना दिसतात. 'बाजीराव मस्तानी'मध्ये एकत्र काम केलेल्या प्रियांका आणि दीपिकामध्ये सध्या काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे हे कोल्डवॉर एका अभिनेत्रीवरुन सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमान खान हृतिक रोशनवर नाराज असल्याचं वृत्त आहे. आयफा 2016 पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि हृतिकमध्ये वाद झाले होते. याला सलमानची जवळची अभिनेत्री समजली जाणारी डेझी शाह कारणीभूत ठरली होती.
आयफा सोहळ्यात सलमानने हृतिकला डेझीसोबत परफॉर्म करण्यास सांगितलं होतं. पण हृतिकने यासाठी साफ नकार दिला. इतकंच नाही तर डेझीसोबत स्टेज शेअर करणार नाही, असं हृतिकने आयफा आयोजकांनाही सांगितलं.
याआधी सलमान आणि हृतिक यांच्यात कटुता आल्याचं वृत्त होतं. हृतिक रोशनच्या 'गुजारिश'वर थेट वार करत सलमान म्हणाला होता की, "कुत्राही या सिनेमा पाहण्यासाठी जाणार नाही." सलमानच्या या विधानावर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement