Kiran Mane: 'त्या दिवसापासून दारू अशी सुटलीये की, आता चितेवर जाईपर्यंत एक थेंबही प्यायची इच्छा..'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष
किरण माने (Kiran Mane) यांनी दारुच्या व्यसनाबाबत दोन वर्षांपूर्वी केलेली पोस्ट रिपोस्ट केली आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. किरण माने हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच त्यांनी दोन वर्षांपूर्वी दारुच्या व्यसनाबाबत फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट रिपोस्ट केली आहे. किरण माने यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांनी त्यांचा एक फोटो फेसबुकवर शेअर केली. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,' त्या दिवसापासून दारू अशी सुटलीये की, आता चितेवर जाईपर्यंत एक थेंबही प्यायची इच्छा होणार नाय ! दहा वर्ष उलटून गेली...पिण्याचं प्रमाण वाढलं होतं ! अभिनयातलं करिअर अर्धवट सोडून व्यवसाय सुरू करायला लागला होता. घरची परीस्थिती फार चांगली नव्हती. पर्यायच नव्हता. आज सातार्यात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत.. पण त्यावेळीपासून सातार्यात माझ्यावर खार खाऊन असलेलं - हितशत्रूंचं एक आठदहा जणांचं टोळकं आहे. ते खूप खुश झालं होतं. "किरन्या लै उड्या मारत होता. बच्चन समजत होता स्वत:ला. बसला दुकानात आता." अशी त्यांची एकमेकांना टाळ्या देत चर्चा सुरू झाली होती. माझ्यासमोर यायला घाबरणारी बेडकं, वाट वाकडी करून दुकानावर चक्कर मारत होती. मी वरवर माज दाखवत होतो, पण आतून पार खचलोवतो. रात्री 'गुलबहार' नायतर 'अवंती' मध्ये जाऊन दोन पेग मारल्यावर डोकं थंड व्हायचं. दुकानामुळं पैसा यायला लागलावता. ती चिंता नव्हती आता.'
किरण माने यांनी दारुच्या व्यसनामुळे आलेले अनुभव या पोस्टमध्ये मांडले. या पोस्टच्या शेवटी किरण माने यांनी लिहिलं, 'दोन वर्षांपूर्वी ही पोस्ट वाचून अनेक फोन आले होते मला. "सर, मी ही अभिनेता आहे. दारूपायी माझा संसार,करिअर सगळं उध्वस्त झालंय. एकेकाळी अभिनयाची अनेक पारितोषिकं घेतलीत. तुमची पोस्ट वाचली. मला तुमच्यासारखंच व्यसनमुक्त व्हायचंय. काय करू?' एक रत्नागिरीचा आणि एक इचलकरंजीचा असे दोघेजण व्यसनमुक्त झालेही ! वरचेवर नवनविन फाॅलोअर्सनी ही पोस्ट वाचावी यासाठी रिपोस्ट करत रहाणं गरजेचं वाटतं मला.'
बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमुळे किरण माने यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात.
संबंधित बातम्या
Kiran Mane : सातारच्या बच्चनला मिळाली नवी मालिका; 'बिग बॉस'नंतर आता पुन्हा गाजवणार छोटा पडदा