Kiran Mane : किरण मानेंनी दसऱ्याच्या मुहुर्तावर घेतली तृतीयपंथीयांची भेट; म्हणाले,"माझा दिवस सोन्याचा केला"
Kiran Mane : किरण माने यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर तृतीयपंथीयांची भेट घेतली आहे.
Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मनोरंजनसृष्टीसह राजकीय विषयावर त्यांची मतं मांडत असतात. आता दसऱ्याच्या मुहुर्तावर त्यांनी तृतीयपंथीयांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
किरण मानेंची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)
तृतीयपंथीयांच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर करत किरण मानेंनी लिहिलं आहे,"आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला!
काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, "किरणजी,तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबॉसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही...." ऐकताना माझे डोळे पाणावत होते".
View this post on Instagram
किरण मानेंनी पुढे लिहिलं आहे,"खास माझ्यासाठी खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला. "आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल... सुपरस्टार व्हाल. जगात नांव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत." असं म्हणून लाखमोलाचा आशीर्वाद देऊन गेले. बाकी काहीही असो भावांनो ही अशी माया खूप कमी जणांना लाभते. फॅन्सच्या 'लाईव्ह' प्रेमाबाबतीत मी खूप भाग्यवान आहे. कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत... पण माझा द्वेष करणार्यांचा मला जरासुद्धा राग येत नाही... कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन..जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बडे है".
किरण माने यांच्या पोस्टवर चाहत्यांनी जिवंत कलाकार, मनाचा राजा आहेस तू, दसऱ्याच्या शुभेच्छा, आज तुमच्याबद्दल आणखी आदर वाढला, खूप खूप प्रेम, आयुष्यातली खरी कमाई अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या