![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटामधील 'राम सिया राम' गाण्याचा खास व्हिडीओ टांझानियाच्या किली पॉलनं केला शेअर; नेटकरी म्हणाले, 'जय श्री राम'
नुकतेच किली पॉलनं (Kili Paul) 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामधील 'राम सिया राम' या गाण्यावरील रील शेअर केलं आहे.
![Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटामधील 'राम सिया राम' गाण्याचा खास व्हिडीओ टांझानियाच्या किली पॉलनं केला शेअर; नेटकरी म्हणाले, 'जय श्री राम' Kili Paul And Neema share video of Adipurush Song ram siya ram video viral on social media Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटामधील 'राम सिया राम' गाण्याचा खास व्हिडीओ टांझानियाच्या किली पॉलनं केला शेअर; नेटकरी म्हणाले, 'जय श्री राम'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/21ad52b9131a5fb1e478282bcc1b17271686550550972259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adipurush: सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या गाण्यावरचे व्हिडीओ किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. नुकतेच त्यानं 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामधील 'राम सिया राम' या गाण्यावरील रील शेअर केलं आहे. त्याच्या या रीलवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
आदिपुरुष चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला सचेत टंडन, परंपरा टंडन यांनी संगीत दिलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावरील रील किली पॉल आणि त्याची बहीण नीमा यांनी शेअर केलं आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'श्री राम,जय हिंद'. किली आणि निमा यांच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
किली आणि निमा यांच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी 'जय श्री राम' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'हे तुमचे सर्वात चांगले रील आहे.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
किली (Kili Paul) आणि नीमा यांनी काही दिवसांपूर्वी 'बहरला हा मधुमास नवा' या मराठी गाण्यावरील व्हिडीओ देखील शेअर केला होता. तसेच 'जाने बलमा घोडे पे क्यों सवार है', 'पतली कमरिया' या गाण्यावरील किली आणि नीमा यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं देखील रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Adipurush: 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा...'; गुडबाय किसच्या वादादरम्यान क्रितीची पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)