Adipurush: 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा...'; गुडबाय किसच्या वादादरम्यान क्रितीची पोस्ट
Adipurush: क्रितीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Adipurush: कृती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) यांचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या एका व्हायरल व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ज्यामध्ये क्रिती आणि ओम हे तिरुपती येथील मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेले दिसत आहेत. दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या आवारात असताना ओम राऊतनं क्रितीला गुडबाय किस केलं. ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. आता या वादादरम्यान क्रितीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
क्रितीची पोस्ट
क्रितीनं आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा आणि कालच्या प्रीरिलीज इव्हेंटमध्ये तुम्ही सर्वांनी आदिपुरुष आणि जानकीवर केलेले अतुलनीय प्रेम! या सर्व गोष्टींमुळे माझ्या हृदयात सकारात्मकता निर्माण झाली'
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक ओम राऊत आणि कृती सेनन मंदिर परिसरात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दर्शनानंतर जेव्हा क्रिती तिथून टीमचा निरोप घेते तेव्हा ओम राऊतने तिला मिठी मारली आणि नंतर तिला गुडबाय किस केलं. मंदिराच्या आवारात क्रिती आणि ओम यांनी एकमेकांना मिठी मारली आणि गुडबाय किस केलं त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. अनेक जण क्रिती आणि ओम यांना ट्रोल करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Adipurush Trailer: 'आदिपुरुष'चा दुसरा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; डायलॉग्सनं वेधलं लक्ष
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















