एक्स्प्लोर

Rama Raghav : 'रमा राघव' मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग! बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन...

Rama Raghav : 'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग रंगणार आहे.

Rama Raghav Serial Raksha Bandhan Special Episode : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता 'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग रंगणार आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधून वचन दिल्याने हा भाग नक्कीच खास असणार आहे.

'रमा राघव' या मालिकेत येत्या मंगळवारी 29 ऑगस्ट आणि बुधवारी 30 ऑगस्टला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या यंदाच्या रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे. ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे.

'रमा राघव'चा विशेष भाग कधी रंगणार? 

'रमा राघव' या मालिकेच्या सुरुवातीपासूनच 'रमा राघव' ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे विशेष चर्चेत आहे. अत्यंत स्वार्थी आई, त्यात वडिलांनी केलेली दोन लग्न यामुळे बिघडलेली, नातेसंबंधावरचा विश्वास उडालेली रमा ते पुरोहित घरातल्या वातावरणाने बदलेली सगळ्यांचा विचार करणारी, संस्कारी रमा हा टप्पा प्रेक्षकांना विस्मयचकीत करणारा ठरला आहे.'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग 29 आणि 30 ऑगस्टला रात्री 9 वाजता रंगणार आहे.

माणूस बदलू शकतो, त्याला योग्य संस्कार आणि संगत याची जोड मिळायला हवी. हा पुरोहितांचा विश्वास रमाने सार्थ ठरवला. याचीच एक पुढची पायरी गाठत रमाने तिची सावत्र बहीण आरुषी सोबत  बहीण म्हणून छान नाते फुलवले आहे. या नात्यालाच यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्यात एक लोभसवाणे वळण मिळणार असून रमाच्या आग्रहातून छोटी बहीण आरुषी, मोठी बहीण रमाला राखी बांधणार आहे. जिथे रमा तिच्या रक्षणाचे वचन देते. 

सध्या ही मालिका रमाराघवच्या नात्याला रमाच्या आईच्या असलेल्या टोकाच्या विरोधाच्या टप्प्यावर आहे, रमाच्या आईने ज्या वरुणसोबत रमाचे लग्न ठरवले आहे, तो आरुषीच्या प्रेमात असून वरुण – आरुषीने लग्न करायचे ठरवले आहे, ज्याला रमाचा पाठिंबा आहे. रक्षाबंधनाच्या या वचनामुळे हा नात्यांचा गुंता अधिकच रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. 

'रमा राघव' मालिकेबद्दल जाणून घ्या...

'रमा राघव' या मालिकेतील खट्याळ रमा आणि प्रेमळ राघव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची तिखट गोड गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आयुष्यात आदर्श, तत्त्व, मूल्य यांचं महत्त्व नव्या पिढीला हलक्या फुलक्या रितीने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जात आहे. 

संबंधित बातम्या

Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget