(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karisma Kapoor Kissing Scene: आईसमोरच करिश्मानं शूट केलेला सर्वात लांब किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकमध्ये पूर्ण झालेला शॉट!
Raja Hindustani: 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या सर्वात रोमँटिक चित्रपटांमध्ये राजा हिंदुस्तानीचाही समावेश आहे. मात्र, हा चित्रपट आणखी एका कारणानं चर्चेत होता आणि तो म्हणजे, करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या किसिंग सीनमुळे.
Karisma Kapoor Kissing Scene: नव्वदच्या दशकातील गाजलेली आणि देशभरातील असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री म्हणजे, करिश्मा कपूर. आजही ही अभिनेत्री अनेकांच्या काळजाचा ठाव घेते. अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असली तरीदेखील एक काळ होता, ज्यावेळी तिनं चित्रपटसृष्टी गाजवली. राजा हिंदुस्तानी (Raja Hindustani) करिश्मानं दिलेल्या हिट बॉलिवूडपटांपैकी एक. राजा हिंदुस्तानीमध्ये करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि आमिर खान (Aamir Khan) या दोन सुपरस्टार्सची जोडी खूप गाजली होती. चित्रपटातील गाण्यांनी तर लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. इतकंच नाहीतर, चित्रपटातील ड्रामा आणि रोमान्सची मोठी चर्चा झाली होती. राजा हिंदुस्तानीला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं.
90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या सर्वात रोमँटिक चित्रपटांमध्ये राजा हिंदुस्तानीचाही समावेश आहे. मात्र, हा चित्रपट आणखी एका कारणानं चर्चेत होता आणि तो म्हणजे, करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या किसिंग सीनमुळे. चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यात एक रोमँटिक सीन होता. ज्याची जोरदार चर्चा झाली होती.
किसिंग सीन शूट कसा केला?
राजा हिंदुस्तानी चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी करिश्मा आणि आमिरचा किसिंग सीन कसा शूट केलेला? याचा खुलासा केला होता. त्यावेळी दिग्दर्शकांनी सांगितलेलं की, करिश्माची आई बबीता कपूर यांच्या मदतीनं किसींग सीन शूट करण्यात आला होता. किसिंग सीन शूट करत असताना करिश्माच्या आईनं सर्वात आधी तिला कंफर्टेबल केलं होतं.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्यातील किसिंग सीन शूट करण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले होते. तर, यासाठी तब्बल 47 रिटेक्स घेण्यात आले होते. दिग्दर्शकांनी सांगितल्यानुसार, सर्वात आधी त्यांचा प्लान हा किसिंग सीन पोस्टरवर ठेवून चाहत्यांमध्ये खळबळ माजवणार होते. पण, नंतर त्यांनी हा प्लान ड्रॉप केला. दरम्यान, करिश्मा, आमिरमधला किसिंग सीन उटीमध्ये शूट करण्यात आला होता.
करिश्मा नाहीतर, ही अभिनेत्री होती फर्स्ट चॉईस
एका मुलाखतीत दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी सांगितलं होतं की, फिमेल लीडसाठी करिश्मा कपूरच नाहीतर जुही चावला पहिली पसंत होती. दिग्दर्शकांना सांगितलं होतं की, त्यांना हम आपके है कौनमध्ये माधुरी दीक्षितसारखं रोल करुन घेणार होते. पण, माधुरीचं नाव ऐकून जुही चावलानं माघार घेतली. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी पूजा भट्ट आणि ऐश्वर्या राय यांच्याशीही संपर्क साधला होता, पण दोघींनीही स्क्रिप्ट नाकारली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
8 सप्टेंबरला जन्मली दीपवीरची चिमुकली; अत्यंत खास आहे 'हा' नंबर, जाणून घ्या कनेक्शन काय?