Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video : बॉलिवूडचे सैफीना कुठेही गेले तरी पापाराझी त्यांचा पाठलाग करतात. आता करीना आणि सैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची जोडी बॉलिवूडमध्ये 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाते.बी-टाऊनमधील हे कपल नेहमीच चर्चेत असते. हे कपल अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. बॉलिवूडचे सैफीना कुठेही गेले तरी पापाराझी त्यांचा पाठलाग करतात. आता करीना आणि सैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर, काहींनी त्यांच्यात किती प्रेम आहे हे सांगितले.
सैफीनाचा व्हिडीओ व्हायरल...
करीन कपूर खान आणि सैफ अली खान यांना रविवारी, 12 मे रोजी घराबाहेर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी दोघेही मॅचिंग कलरच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसले. दोघांनीही व्हाईट कलरचा कुर्ता परिधान केला होता. या ड्रेसमध्ये दोघेही कूल दिसत होते. करीना-सैफ यांना एकत्र पाहुन पापराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले.यावेळी सैफीना प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे दिसले.
सैफ आणि करीनाने एकमेकांना....
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही आधी आपापल्या इमारतीतून बाहेर पडतात आणि नंतर आपापल्या कारमध्ये बसायला जातात. मात्र कारमध्ये बसण्यापूर्वी दोघेही लिप लॉक करताना दिसले. त्यांनी एकमेकांना एकदा नव्हे तर दोनदा किस केले. त्याचा हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
ट्रोलर्सने साधला निशाणा....
करीना आणि सैफ यांचा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर, काहींनी त्यांना टोलाही लगावला. काहींनी त्यांना रोमँटिक कपल असल्याचे म्हटले. बऱ्याच जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले की, या गोष्टी बेडरुममध्ये ही करता येऊ शकतात. देशाची संस्कृती खराब करत आहेत. एकाने म्हटले की, बेडरुम कमी पडला का, जे काम तुम्ही रस्त्यावर करताय. घरात तुम्हाला वेळ मिळत नाही का, असा प्रश्न एका युजरने विचारला. ही मंडळी पब्लिसिटी काहीही करू शकतात, असेही एकाने म्हटले.