Kareena Kapoor Khan : करिना कपूरच्या 'त्या' वक्तव्यावर सचिन गालात हसला; सैफ दोघांकडे बघतच बसला
Kareena Kapoor Khan : इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगच्या एका कार्यक्रमात करिनाच्या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा आहे.
Kareena Kapoor Khan : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) हा इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगच्या कोअर कमिटीचा सदस्य आहे. याच आयएसपीएलचा दुसरा हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली. 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा दुसरा हंगाम रंगेल. पण त्याआधी पार पडलेल्या कार्यक्रमाला सचिन तेंडूलकर, करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी हजेरी लावली होती.
या तिघांनी एकत्र मुलाखत देत अनेक मुद्द्यांवर भाष्य देखील केलं. त्याचप्रमाणे याच मुलाखतीमध्ये करिनाने केलेल्या एका वक्तव्यावर सचिन तेंडूलकर गालातल्या गालात हसला आणि त्याने त्यावर सैफ अली खान हा त्या दोघांकडेही पाहत राहिला. नेमकं काय झालं ते सविस्तर जाणून घेऊयात.
करिनाचं ते वक्तव्य अन् सचिनचं हास्य
करिनाने या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, महाराष्ट्र जन्मलेली आणि पूर्णपणे मुंबईकर असलेल्या मला सध्या एका गोष्टीचं फार कौतुक वाटतंय. आजवर ज्यांना आम्ही टिव्हीत पाहिलं त्यांच्या सचिन तेंडूलकर यांच्या शेजारी मी बसले आहे. तेव्हा त्यांना टिव्हीवर पाहून होणारा आनंद आणि आता त्यांच्या शेजारी बसणं ही गोष्ट फार खास आहे. यावर सचिन तेंडूलकर गालात हसला.
'तर ती टीम माझी असेल...'
दरम्यान यावेळी करिनाने बोलताना म्हटलं की, मला असं वाटतं की, 'जो दर्जा आणि सन्मान पुरुष क्रिकेटर्सना मिळतो, तोच महिलांना पण मिळावा'. 'आयएसपीएलमध्ये जर महिलांची टीम आली तर त्याची सगळ्यात आधी ओनर मी असेन', अशी घोषणाही करिनाने केली आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग नेमकं काय?
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL ही स्टेडियममध्ये खेळली जाणारी भारताची पहिली-वहिली टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या पहिल्या सीजनच्या प्रचंड यशानतर आता याच स्पर्धेचा दुसरा सीजन पुढील वर्षी दादोजी कोंडदेव स्येटेडीय इथे 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार असल्याची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. यावेळी ज्याच्या संकल्पनेतून ही आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, त्या स्पर्धेतील एका टीमचे मालक सैफ अली खान आणि करीना कपूर, तसेच मुंबई क्रिकेट क्लबचे सदस्य आशिष शेलार हे उपस्थित होते.
View this post on Instagram