एक्स्प्लोर
वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत
मुंबईः सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली'ने पहिल्या दिवशी 55 कोटींची बंपर ओपनिंग करत भारतीय सिनेमांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफीसवर 'कबाली'ची दुसऱ्या दिवशीची कमाई 45 ते 50 कोटी रुपये अपेक्षित आहे. यासोबतच 'कबाली'ने सलमान खानच्या 'सुलतान'लाही मागे टाकलं आहे.
'सुलतान'ने पहिल्या दिवशी 36.54 कोटींचा गल्ला जमवला होता. तर कबालीने पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई केली. रजनीकांतचा हा तिसरा हायबजेट सिनेमा आहे. या सिनेमाचं एकूण बजेट 110 कोटी रुपये आहे.
परदेशात भारतीय सिनेमाचा विक्रम
'कबाली'ने परदेशात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्याच दिवशी 'कबाली'ने अमेरिका, कॅनडा आणि मलेशियामध्ये 13 कोटींची कमाई केली. 'कबाली' वर्ल्डवाईड सहा हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर भारतात 12 हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे.
'कबाली'च्या हिंदी डबींगने पहिल्या दिवशी 5.2 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी हा विक्रम बाहुबलीच्या नावे होता. 'बाहुबली'च्या हिंदी डबने 5 कोटींची कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement