(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jovan Veer Singh Plaha : 'जोवन वीर सिंह प्लाहा'; हरभजन आणि गीता बसरा यांच्या मुलाच्या नावाचा नेमका अर्थ काय?
भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि हिंदी मलिकेतील अभिनेत्री गीता बसरा यांच्या नवजात बालकाचं नाव 'जोवन वीर सिंह' असं ठेवण्यात आलं आहे. नाव थोडं वेगळं आहे पण त्याचा अर्थ मात्र तितकाच सुंदर आहे.
मुंबई : सध्या कलाकारांपेक्षा त्यांची मुलांचीच जास्त चर्चा असते. याची बरीच उदाहरणं देखील आहेत. जसे की, करीना कपूर खान-सैफ अली खान यांचा पुत्र, अनुष्का-विराट यांची कन्या, त्याचबरोबर असे बरेच कलाकार आहेत. हीच गोष्ट हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाबद्दल आहे. त्यांच्या घरी अजून एका नव्या पाहूण्याचे आगमन झालं आहे. मात्र त्या बालाचे नाव विशेष असं आहे. त्याच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे.
भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि हिंदी मलिकेतील अभिनेत्री गीता बसरा हे जवळजवळ तीन वर्ष सोबत होते. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये लग्न केले. त्यांना हिनाया नावाची कन्या लाभली. आता 10 जुलैला त्यांना पुत्ररत्न झाले. गीता बसराने आपल्या सोशल मीडियातून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या कन्येसोबत तिच्या नवजात बालकाचा फोटो शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये त्या बालकाचा चेहरा अद्यापही दाखवला नाही. पण हल्लीच त्याचं बारसं पार पडला. त्यात त्या मुलाचे नाव अगदी वेगळं असं ठेवण्यात आलं आहे आणि ते नाव तिने हा फोटो शेअर करत खालील कॅप्शन मध्ये लिहिले आहे. ते कॅप्शन असे की ‘हीर का वीर...जोवन वीर सिंह प्लाहा'. म्हणजेच त्यांच्या बाळाचं नाव जोवन वीर असे ठेवण्यात आले आहे. ऐकण्यात थोडं वजनदार आहेच मात्र नावाचं अर्थही तितकाच सुंदर आहे.
गीता बसरा हिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम वरील पोस्टमध्ये तिने आपली कन्या हिनाया सोबत आपल्या नवजात बालकासोबत चेहरा न दाखवताचा सुंदर असा फोटो शेअर केला आहे. जोवन वीर सिंह प्लाहा या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी सर्व जण उत्साहित आहेत, त्याचा खरा काय तो अर्थ शोधण्यासाठी इंटरनेटवर खूप प्रयत्न केला. त्याचा अर्थ शोधला तर जोवर म्हणजे जवानी असा सापडतो.
View this post on Instagram
ज्योतिषांनी सांगितलेल्या वर्णनानुसार 'जोवर' नावाचा अर्थ भाग्यवान असा असून त्याला नेहमी यश प्राप्त होईल. जोवर म्हणजे पालकांचे नाव मोठं करणारे आणि त्यांच्यासाठी नशिबवान ठरणारे अपत्य. आता हपभजन-गीता बसराचे हे मुलं आपल्या नावाला जागून नावाचं सार्थक करणार का हे येणारा काळच ठरवेल.
महत्वाच्या बातम्या :