Raj Kundra Police Custody : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी
Raj Kundra Police Custody : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Raj Kundra Police Custody : पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला 19 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा याच्यावर पॉर्न व्हिडीओ बनवून पब्लिश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोर्टानं राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोठडीत वाढ करण्यात आली होती. आज कोर्टानं राज कुंद्राला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आज कोर्टात पोलिसांनी काय म्हटलं?
पोलिसांनी कोर्टात म्हटलं की, राज कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट अकाउंट फ्रिज करण्यात आलं आहे. कोटक महिंद्रा बँकेत 1 कोटी 13 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
क्राईम ब्रांचनं या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदारांना आवाहन केलं आहे, जे अद्याप समोर आले नाहीत. एका साक्षीदारानं 26 जुलै रोजी क्राईम ब्रांचसमोर जबाब नोंदवला.
पोलिसांनी अॅपल स्टोअरकडे हॉटशॉटची माहिती मागितली, त्यावेळी समजलं की, 1.64 कोटी रुपये मिळाले आहेत. तर गूगलकडून अद्याप माहिती येणं बाकी आहे.
24 जुलै रोजी राज कुंद्राच्या ऑफिसवर टाकण्यात आलेल्या धाडीत फॉरेन ट्रान्झॅक्शनची माहिती मिळाली आहे.
राज कुंद्राच्या मोबाईल आणि रायनच्या Mac Book मधून Hotshots च्या रेवेन्यू आणि पेमेंट्सशी निगडीत चॅट्स मिळाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणई आतापर्यंत राज कुंद्रासोबतच काही जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत राज कुंद्रासह 10 जणांना अटक केली आहे. पॉर्न व्हिडीओ तयार करुन अॅपवर पब्लिश केल्याच्या आरोपाखाली यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pornography Case : शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा; 20 सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याबाबत शिल्पाला माहिती नव्हती; क्राईम ब्रांच करणार तिच्या फोनचं क्लोनिंग
- Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य