एक्स्प्लोर
‘जॉली एलएलबी 2’ची दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळाली आहे. सिनेमाने पहिल्या दोन दिवसात 30.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
सिनेमाने शनिवारी म्हणजे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17.31 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
https://twitter.com/taran_adarsh/status/830650546184941568
सर्वाधिक ओपनिंग मिळालेला ‘जॉली एलएलबी 2’ यंदाच्या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे. मात्र ‘जॉली एलएलबी 2’ला शाहरुख खानच्या ‘रईस’चा विक्रम मोडता आलेला नाही. हृतिक रोशनच्या ‘काबील’सोबत प्रदर्शित होऊनही ‘रईस’ने पहिल्या दिवशी 20.42 कोटींची कमाई केली होती.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी 2’ शुक्रवारी (10 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला होता. 2013 मधील ‘जॉली एलएलबी’चा सिक्वेल आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह अन्नू कपूर, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्लाही प्रमुख भूमिकेत आहेत.
'जॉली एलएलबी 2'ला दमदार ओपनिंग, पहिल्या दिवसाची कमाई...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement