TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
सिनेसृष्टीला सुगीचे दिवस
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कोरोनामुळे अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलत होते. कोरोनाचा सिनेसृष्टीला चांगलाच फटका बसला होता. पण आता पुन्हा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या 'पावनखिंड', 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'झुंड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सरकारने सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत.
नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन
शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला नागराज मंजुळेंचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड' प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.
आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा 100 कोटी क्लबमध्ये समावेश
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 100 कोटी क्बलमध्ये सामील झाला आहे. हा सिनेमा जगभरातील चित्रपटप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आलिया भट्टने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. गंगूबाई काठियावाडीने जगभरात 108.3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उर्वशीच्या चित्रपटाचे शुटिंग थांबले आहे. युक्रेनमधील शूटिंगचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला लग्नाबाबत खुलासा
भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे. अखेर सलमान खान लग्नबंधनात अडकला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. सलमानच्या या व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सलमानने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे,"लग्न झालंय की नाही झालं? जाणून घेण्यासाठी परवापर्यंत वाट पाहा". सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.
संबंधित बातम्या
Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण
Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना
Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha