Jhimma movie: मनोरंजनाचे फुल्ल ऑन पॅकेज देणारा 'झिम्मा'चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Jhimma Trailer Coming: 'झिम्मा' सिनेमाचा ट्रेलर 19 नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाचे फुल्ल ऑन पॅकेज देणारा हा कौटुंबिक सिनेमा आहे
Jhimma Trailer Coming on 9 Nov: मराठीतील 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहे. गेले अनेक दिवस 'झिम्मा' सिनेमाच्या चर्चा होत होत्या. सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत होती. प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे 'झिम्मा' सिनेमाचा ट्रेलर येत्या 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'झिम्मा' हा मराठीतील पहिला बिग बजेट सिनेमा आहे. त्यामुळे मराठी सिनेप्रेक्षकांना आता लवकरच सिनेमागृहात जाऊन झिम्माच्या खेळात सहभागी होता येणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा चित्रपट असणार आहे. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे.
Pushpa Film: Allu Arjun आणि Rashmika Manadana चा 'पुष्पा- द राइज' सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही, जाणून घ्या कारण..
'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. अमितराज यांनी या चित्रपटाचे संगीत केले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी प्यू फिल्मस निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा आहे.
Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका
"आपल्या झिम्माच्या सुपर अॅडव्हेंचर ट्रिपचा पुढचा टप्पा.. ट्रेलर येत आहे 9 नोव्हेंबरला", असे म्हणत सिनेमातील कलाकारांनी ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. झिम्मानंतर आता अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहेत. मराठीतील अनेक बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे. प्रेक्षकांना आता उत्तम कथानक आणि सादरीकरण असलेले सिनेमे पाहता येणार आहेत.
'एक महल हो सपनोंका'! Ranbir Kapoor आणि Alia Bhatt पोहोचले नव्या घराचे बांधकाम पहायला
'कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव' चित्रपटातील गाण्याला मिळतोय उत्तम प्रतिसाद
'झिम्मा' सिनेमातील 'कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव' या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या गाण्यात चित्रपटातील कलाकार मंडळी एका शहरात फिरताना दिसून आली होती. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकरने हे गाणे गायले आहे.