(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉलिवूड चित्रपटांची मक्तेदारी मोडत 'झिम्मा' आणि 'जयंती'ची यशस्वी भरारी
'झिम्मा' आणि 'जयंती' सिनेमाला प्रचंड यश मिळत आहे. बॉलिवूड सिनेमांची मक्तेदारी मोडत दोन्ही सिनेमांनी यशस्वी भरारी घेतली आहे.
Jhimma - Jayanti : चित्रपटगृह सुरू झाल्यापासून बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट एका पाठोपाठ एक झळकत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमांनीदेखील त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. 'झिम्मा' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्लचे आपले स्थान कायम ठेवले आहे. पहिल्या आठवड्यात असलेले 'झिम्मा'चे 325 शोज दुसऱ्या आठवड्यात आता 700 हून अधिक म्हणजेच दुपटीहून अधिक झाले आहेत. त्यामुळे लॅाकडाऊनंतरचा 'झिम्मा' हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला आहे.
दुसरीकडे 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'जयंती' सिनेमा बॉलिवूड सिनेमांची मक्तेदारी असतानादेखील तिसऱ्या आठवड्यात थाटाने उभा आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिथे मराठी चित्रपट कमी प्रमाणात लागतात तेथेदेखील जयंती तग धरून बसला आहे.
आता या सिनेमाची ख्याती सातासमुद्रापार देखील पसरली आहे. ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा आणि दुबई या देशातील सिनेमागृहातदेखील 'जयंती' हा सिनेमा दाखवला जाणार आहे. प्रेक्षकवर्ग खऱ्या अर्थाने जगभरात जयंती साजरी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
'झिम्मा' सिनेमाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो,"सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत."
संबंधित बातम्या
Rajkummar-Patralekhaa : राजकुमार राव-पत्रलेखाच्या लग्नाला आला नाहीत? काळजी नको... लग्नाचे लाडू आणि खास संदेश घरपोच मिळतोय
26/11 Mumbai Attack: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Bigg Boss Marathi 3 : घरामध्ये रंगणार भन्नाट टास्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha