Jacqueline Fernandez Bail : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा! अभिनेत्रीचा अंतरिम जामीन मंजूर
Jacqueline Fernandez Bail : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) मोठा दिलासा मिळाला आहे.
![Jacqueline Fernandez Bail : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा! अभिनेत्रीचा अंतरिम जामीन मंजूर Jacqueline Fernandez Interim Bail Granted By Sessions Court in Rs 200 Crore Money Laundering Case Jacqueline Fernandez Bail : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा! अभिनेत्रीचा अंतरिम जामीन मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/79d233d94fcf1e6bcf4231bd0daed4351664169288966373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jacqueline Fernandez Bail : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जॅकलिनचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल 15 तास जॅकलिनची चौकशी केली. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलिनमध्ये मैत्रीचे असल्याचे समोर आले. त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीसाठी आज (26 सप्टेंबर) जॅकलिन कोर्टात हजर झाली.
या प्रकरणात ईडीने 17 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला (Jacqueline Fernandez) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असल्याचे म्हणण्यात आले होते. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढत गेल्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून, तिचा अंतरिम मंजूर करण्यात आला आहे.
डिझायनरची साक्ष ठरली महत्त्वाची
जॅकलिन फर्नांडिसची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली. ज्यामध्ये लिपाक्षीने सुकेश आणि जॅकलिनबद्दल अनेक खुलासे केले होते. सुकेशने जॅकलिनला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी तिला तीन कोटी रुपये दिल्याची कबुली लिपाक्षीने दिली होती. तर, सुकेशच्या अटकेच्या वृत्तानंतर जॅकलिन फर्नांडिसने त्याच्याशी संबंध तोडले, असेही लिपक्षी म्हणाली होती.
अनेकांनी दिलेला लांब राहण्याचा सल्ला!
दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान, जॅकलिन फर्नांडिसने कबूल केले की, सुकेशच्या जीवनशैलीचा तिच्यावर खूप प्रभाव होता. या तपास पथकात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जॅकलिनच्या कोस्टार्सनी तिला सुकेशपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, तरीही ती सुकेशला भेटत राहिली आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत राहिली.
सुकेशनं जॅकलिनला दिले महागडे गिफ्ट्स
सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) नाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता.
संबंधित बातम्या
Jacqueline Fernandez : 'नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?' जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल
Jacqueline Fernandez : "मी माझ्या कष्टाने संपत्ती कमावली"; मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)