Jacqueline Fernandez : "मी माझ्या कष्टाने संपत्ती कमावली"; मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण
Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने मनी लाँड्रिंग प्रकरणी तिच्या संपत्तीवर भाष्य केलं आहे.
Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलीनने आज ईडी अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवत म्हटलं आहे,"मी माझ्या कष्टाने पैसे कमावले आहेत.
जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलीनच्या नावाचादेखील समावेश आहे. त्यामुळे आता तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. माझ्याकडे जेवढी बचत असून ती वैध असून त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. माझ्याकडे जे फिक्स्ड डिपॉजिट आहे ते अनेक वर्षांपासून आहे. ते फिक्स्ड डिपॉजिट जुने आहेत. त्यावेळी मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते".
Jacqueline Fernandez Money Laundering case | The actor in a reply to adjudicating authorities of PMLA stated that the Fixed Deposits, attached vide the impugned order, have no nexus with a crime nor the Fixed Deposits are created by using the alleged proceeds of crime
— ANI (@ANI) August 24, 2022
(File Pic) pic.twitter.com/5UHlqjkOQC
The deposits are from the actor’s “own legitimate of income and much before in time from even knowing that the main accused Chandrashekhar even existed in this world,”
— ANI (@ANI) August 24, 2022
जॅकलिनने गेल्या वर्षी ईडीकडे नोंदवलेल्या तिच्या जबाबात म्हटलं होतं की, तिला सुकेशने गुची आणि चॅनेलच्या डिझायनर बॅग आणि कपडेदेखील दिले होते. इतकंच नव्हे तर तिला चंद्रशेखरकडून बहुरंगी दगडांचे ब्रेसलेट आणि दोन हर्मीस ब्रेसलेट देखील मिळाले. या शिवाय सुकेशने तिला मिनी कूपर कारही भेट दिली होती, पण तिने ती परत केल्याचं ईडीला सांगितले. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने एका पटकथा लेखकाला तिच्या वेब सीरिजच्या प्रोजेक्टसाठी आगाऊ रक्कम म्हणून 15 लाख रुपये दिले होते. ईडीचा आरोप आहे की, गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून भेटवस्तू खरेदी केल्या गेल्याची माहिती जॅकलिन होती. चंद्रशेखरने त्याची दीर्घकाळची सहकारी पिंकी इराणीली जॅकलिनला भेटवस्तू देण्यासाठी ठेवले होते.
ईडीच्या आरोपपत्रामध्ये सुकेशने जॅकलीनला 52 लाख किमतीचा घोडा आणि नऊ लाख किमतीचे एक पर्शियन मांजर तसेच 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होती. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनच्या कुटुंबीयांना USD 1 लाख आणि AUD 2,67,40 भेट दिले होते. हा सगळा पैसा फसवणूक करुन सुकेशने मिळवला होता. गुन्ह्याचा पैसा वापरल्यामुळे जॅकलिन अडचणीत आली आहे.
संबंधित बातम्या
Jacqueline Fernandez : मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आरोपी, ईडीकडून कारवाई
Jacqueline Fernandez : महागडी ज्वेलरी ते 52 लाखांचा घोडा; फक्त जॅकलिनच नाही तर तिची बहिण आणि आईला देखील सुकेशनं दिले कोट्यवधींचे गिफ्ट्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)