एक्स्प्लोर
सहकलाकाराला थप्पड लगावल्यानंतर इशिता दत्त ढसाढसा रडली

मुंबई : टीव्ही अभिनेत्री इशिता दत्तने तिचा सहकलाकार वात्सल सेठला थप्पड लगावली. मात्र यानंतर इशिताला अश्रू अनावर झाले. 'लाईफ ओके' या चॅनलवरील 'रिश्तों का सौदागर - बाजीगर' या मालिकेत थप्पड लगावण्याचा सीन चित्रीत करायचा होता. यावेळी इशिताला वात्सलच्या थोबाडीत मारायचं होतं. याबाबत इशिता म्हणाली की, "खरंतर थप्पड मारायची म्हणून सुरुवातीला मी वात्सला चिडवायला लागले. पण सीन सुरु झाल्यावर फारच नर्व्हस झाले होते. मात्र वात्सलने मला या सीनसाठी तयार केलं. सीन पार पडला, परंतु मला अतिशय वाईट वाटत होतं आणि मी रडायला लागले." "यानंतर मला आणखी वाईट वाटू नये म्हणून वात्सलने मला मिठी मारली, जोक्स सांगितले," असंही इशिताने सांगितलं. "पण माझ्या सहकलाकाराला थोबाडीत मारण्याची पहिली आणि शेवटची वेळ असेल," असंही तिने स्पष्ट केलं. इशिता दत्ता ही बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची धाकटी बहिण आहे. शिवाय निशिकांत कामतच्या 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका इशिताने साकारली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























