एक्स्प्लोर
शाहरुख खानला चौथ्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता?
मला वाटतं लवकरच मला चौथं बाळ होणार आहे आणि मी तिचं नाव आकांक्षा ठेवणार आहे.' असं शाहरुख म्हणाला.
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान चौथ्यांदा बाप होण्यासाठी उत्सुक आहे. ही मनोरंजन विश्वातील अफवा नसून खुद्द शाहरुखने याचे संकेत दिले आहेत. 'टेड टॉक्स- इंडिया नयी सोच'च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने ही इच्छा व्यक्त केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शाहरुखला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. नुकतंच शाहरुखने आपल्या चौथ्या बाळाची मनिषा व्यक्त केली. विशेष म्हणजे शाहरुखला मुलगी हवी असून तिचं नाव 'आकांक्षा' ठेवण्याचा मानसही त्याने बोलून दाखवला.
'टेड टॉक्स' या कार्यक्रमाच्या शूटिंगच्या वेळी शाहरुखने आपली इच्छा बोलून दाखवली. आकांक्षा हे नाव उच्चारताना शाहरुख अडखळत होता. त्यामुळे त्याला अनेक टेक्स घ्यावे लागले, असं 'पिंकविला' या बॉलिवूड वेबसाईटने म्हटलं आहे.
'मी आकांक्षा हे नाव घेताना खूप अडखळत आहे, आणि यामुळे मला कसंनुसं वाटतंय, कारण यापूर्वी माझ्यासोबत कधीच असं झालं नाही. मला वाटतं लवकरच मला चौथं बाळ होणार आहे आणि मी तिचं नाव आकांक्षा ठेवणार आहे.' असं शाहरुख म्हणाला. शाहरुखचा सेन्स ऑफ ह्युमर जगजाहीर असल्यामुळे .
शाहरुख सध्या आनंद एल राय दिग्दर्शित 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ झळकणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement