एक्स्प्लोर
“सिनेपुरस्कारांची पर्वा नाही, मात्र पद्म पुरस्कार महत्त्वाचे”
![“सिनेपुरस्कारांची पर्वा नाही, मात्र पद्म पुरस्कार महत्त्वाचे” Irfan Khan Does Not Care For The Film Awards “सिनेपुरस्कारांची पर्वा नाही, मात्र पद्म पुरस्कार महत्त्वाचे”](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/03163535/Irfan-Khan-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॉलिवूड अभिनेता इरफान खान आपल्या अभिनयासह रोखठोक वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. सिनेमांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपेक्षा पद्म पुरस्कार महत्त्वाचे असल्याचं इरफान खान यांनी म्हटलं आहे.
“माझ्यासाठी सिनेपुरस्कार फार महत्त्वाचे नाहीत, मात्र, पद्मश्रीसारखे पुरस्कार मला महत्त्वाचे आहेत. मात्र, तेही पुरस्कार मला तेव्हा दिले जातात, जेव्हा त्यांना गरज वाटते.”, असे इरफान खान म्हणाले.
‘मदारी’च्या प्रचारात इरफान व्यस्त
मला राष्ट्रीय पुरस्कारही तेव्हा दिला गेला, जेव्हा त्यांना असं वाटलं की ते माझी उपेक्षा करु शकत नाहीत. अन्यथा तोपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी कधी नामांकनही मिळालं नव्हत. मला ‘पान सिंह तोमर’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, असे इरफान यांनी सांगितले.
एखाद्या पुरस्कारात पक्षपातीपणा केला गेला असेल, त्या पुरस्काराला काहीही अर्थ नसते, असेही इरफान यांनी नमूद केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)