Institute of Pavtology : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सयाजी शिंदेंच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' झाली निवड
Institute of Pavtology : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' निवड झाली आहे.
Institute of Pavtology : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सयाजी शिंदेंच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' (Institute of Pavtology) सिनेमाची निवड झाली आहे. सयाजी शिंदेंच्या या सिनेमात 250 हून अधिक कलाकारांचा समावेश आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
View this post on Instagram
सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी व्यतिरिक्त दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Rudra: The Edge Of Darkness : अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना भावला, 'रुद्रा' वेबसीरिज प्रदर्शित
Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha