एक्स्प्लोर
बालपणी माझाही विनयभंग झाला होता, सोनम कपूरचा गौप्यस्फोट
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. याच सवयीमुळे तिला अनेकदा टीकेचाही सामना करावा लागतो. मात्र सोनमने नुकत्याच केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बालपणी माझाही विनयभंग झाला होता, असं सोनमने एका मुलाखतीत सांगितलं आहे. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या खास शोमध्ये सोनमने हा खुलासा केला असून हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री विद्या बालन, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि राधिका आपटे या देखील सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीदरम्यान मी देखील विनयभंगाचा बळी असून हा प्रकार अत्यंत व्यथित करणारा आहे, असं सोनमने म्हटलं आहे.
या कार्यक्रमाचा प्रोमो यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्रींना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यानंतर सर्व अभिनेत्रींनी कार्यक्रमात आपापले अनुभव शेअर केले.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement