Vikram Vedha : 'विक्रम वेधा'च्या टीझरला सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज; कलाकार आणि दिग्गज मंडळींकडून कौतुक
'विक्रम वेधा'च्या (Vikram Vedha) टीझरचे प्रेक्षकांबरोबरच चित्रपटक्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केले.
Vikram Vedha : अॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला 'विक्रम वेधा'चा टीझर लाँच झाल्यानंतर तो दिवसभर ट्विटर आणि यूट्यूबवर ट्रेंड करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 'विक्रम वेधा'च्या (Vikram Vedha) टीझरचे प्रेक्षकांबरोबरच चित्रपटक्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केले. यामध्ये विकी कौशल, अभिषेक बच्चन, करीना कपूर-खान, राकेश रोशन, सारा अली खान, आलिया भट्ट, झोया अख्तर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, कतरिना कैफ, क्रिती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चोप्रा, सुनिधी चौहान, तोरंज कायवॉन, नंदिश संधू, पुनित डी मल्होत्रा आणि इतर सेलिब्रिटींचा समावेश आहे.
'विक्रम वेधा' च्या टीझरचे कौतुक करताना विकी कौशलने "फर्स्ट डे, फर्स्ट शो" असे लिहिले. अभिषेक बच्चनने "खूप मस्त" अशी कमेन्ट केली. अभिनेत्री करीना कपूरने 'विक्रम वेधा'च्या टीझरची प्रशंसा केली. परिणिती चोप्राने 'विक्रम वेधा'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि सारा अली खानने 'याची प्रतीक्षा करू शकत नाही, अभिनंदन 'विक्रम वेधा' असे लिहिले.' हृतिक रोशनने साकारलेल्या वेधच्या हटके अवतारापासून ते सैफ अली खानच्या विक्रम या पोलिसाच्या भूमिकेपर्यंत, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आकर्षक आणि मनोरंजक असल्याचे या टीझरमधून दिसून आले.
पाहा टीझर:
गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी 'विक्रम वेधा' हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
काय आहे कथानक?
'विक्रम वेधा' या अॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. 'विक्रम वेधा'चे कथानक नाट्यमय वळणांनी भरलेले आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: