R Madhavan : 'विक्रम वेध' मधील सैफ अली खानच्या भूमिकेबाबत आर. माधवन म्हणाला; 'बघू तो मला हरवू शकतो की..'
विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये विक्रम ही भूमिका आर. माधवननं साकारली होती.
R Madhavan On Saif Ali Khan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. काही दिवसांपूर्वी त्याचा रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर. माधवननं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे. त्याच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha)या साऊथ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता विक्रम वेधा या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे काम करणार आहेत. चित्रपटात वेधा ही भूमिका ह्रतिक साकारणार आहे तर विक्रम ही भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये विक्रम ही भूमिका आर. माधवननं साकारली होती तर वेधा ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. एका मुलाखतीमध्ये आर. माधवननं विक्रम या भूमिकेबाबत सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये आर. माधवन म्हणाला की, ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांची विक्रम वेधा या चित्रपटामधील भूमिका पाहण्यासाठी तो एक्सायटेड आहे. आर. माधवन म्हणाला, 'ह्रतिक हा चांगला दिसतो. पण मी सैफला विक्रम या भूमिकेत पाहण्यासाठी एक्सायटेड आहे. कारण तो मी साकारलेली भूमिका साकारणार आहे. तो मला हरवू शकतो की नाही हे मला जाणून घ्यायचंय. मला वाटतं तो चांगलं काम करेल.'
रॉकेट्री: द नांबी इफेक्टला प्रेक्षकांची मिळाली पसंती
आर. माधवन यांच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 75 लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.25 कोटींची कमाई केली आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रॉकेट्री चित्रपटाचा प्रीमियरही झाला. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे.
हेही वाचा: