Hirve Hirve - Phulrani: 'हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे...'; बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात
‘फुलराणी’ हा चित्रफट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) आणि प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
Hirve Hirve - Phulrani: 'हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे...' ही बालकवींची प्रसिद्ध कविता अनेकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ कवितेनं फुलवल्या. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज 22 मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने साकारली आहे.
संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजलं आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेम कहाणी’ चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
पाहा गाणं:
या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर (Swapnil Bandodkar), प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे. असोशिएट दिग्दर्शक उत्कर्ष शिंदे तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक संतोष वाडेकर आहेत. सायली सोमण यांची वेशभूषा असून रंगभूषा संतोष गायके यांची आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मिलिंद शिंगटे तर लाईन प्रोड्युसरची जबाबदारी आनंद गायकवाड यांनी सांभाळली आहे. 22 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या इतर बातम्या:
Kangana Ranaut: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडताच कंगना भडकली; 'माफिया' म्हणत शेअर केली पोस्ट