Kangana Ranaut: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडताच कंगना भडकली; 'माफिया' म्हणत शेअर केली पोस्ट
अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Kangana Ranaut: मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
कंगनाची पोस्ट
कंगनानं सोशल मीडियावर नेपोटिझमवर भाष्य करत एक वेगळी विजेत्यांची यादी जाहीर केली. तिनं पोस्टमध्ये लिहिलंय की, "नेपो माफिया दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यापूर्वी मी तुम्हाला विजेत्यांची नावं सांगते, बेस्ट अॅक्टर - ऋषभ शेट्टी (कांतारा), बेस्ट अॅक्ट्रेस - मृणाल ठाकूर (सीता रामम), बेस्ट फिल्म – कांतारा, बेस्ट डायरेक्टर - एसएस राजामौली (आरआरआर), बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- अनुपम खेर (कश्मीर फाइल्स), बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - तब्बू (भूल भुलैया) हा पुरस्कार यांचा आहे. ते पुरस्कार सोहळ्यात गेले नाहीत, तरी काही फरक पडत नाही. या पुरस्काराची ऑथेंसिटी नाहीये. माझं काम झालं की, मी संपूर्ण लिस्ट तयार करेन, जे डिजर्व्हिंग आहेत. थँक्यू."
नेपोटिझमवर केलं भाष्य
कंगनानं लिहिलंय की, "नेपो किड्स हे त्यांच्या पालकांच्या नावाचा आणि ओळखींचा वापर करतात, काम मिळवण्यासाठी वडिलांची खुशामत करतात, जर 'सेल्फ मेड' असणारे कलाकार आले, तर त्यांचे करिअर नष्ट करतात. जर कोणाचं करिअर चांगलं सुरू असेल आणि ते त्यांच्यावर होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल ते बोलत असतील तर नेपो किड्स हे त्यांची माफिया पीआरच्या मदतीनं बदनामी करतात. श्रीमद् भागवत गीता सांगते की, वाईटाचा नाश करणे, हे धर्माचे प्रमुख ध्येय आहेत."
कंगनाचे आगमी चित्रपट
2023 मध्ये कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. कंगना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या धाकड या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही. पण आता इमर्जन्सी हा चित्रपट किती कमाई करेल? या प्रश्नाचं उत्तर कंगनाच्या चाहत्यांना लवकरच मिळेल.
महत्वाच्या इतर बातम्या: