एक्स्प्लोर
प्रियांका चोप्राचं आयफामध्ये सामील न होण्याचं खरं कारण...
वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आले, असं प्रियांका सांगत असली तरी खरं कारण वेगळंच आहे.
मुंबई : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मागील आठवड्यात बॉलिवूडचा झगमगाट पाहायला मिळाला, कारण यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा इथेच रंगला. पण यावेळी देसी गर्ल प्रियांका चोप्रा या सोहळ्यात सहभागी झाली नाही.
एकीकडे मागील आठवड्यात बॉलिवूड कलाकार न्यूयॉर्कला रवाना झाले, तर दुसरीकडे प्रियांका आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करायला भारतात परतली. आयफा सुरु असताना प्रियांका भारतात का परतली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आले, असं प्रियांका सांगत असली तरी खरं कारण वेगळंच आहे.
एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, हा पुरस्कार सोहळा होस्ट करण्यासंदर्भात प्रियांका चोप्राला विचारणा झाली होती. पण प्रियांकाने यासाठी जी रक्कम मागितली, ती कमी करण्याची विनंती आयफाने केली होती.
दुसरीकडे प्रियांकाच्या 'इझंट इट रोमँटिक' आणि 'अ किड कॉल्ड जॅक' ह्या दोन हॉलिवूड चित्रपटांचं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे प्रियांकाचं शेड्यूल फारच व्यस्त आहे.
आयफासोबत बोलणी फिस्कटल्यानंतर प्रियांका आपल्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी भारतात आली. प्रियांकाला आयफामध्ये सामील न होण्याचं कारण विचारलं असता तिचं उत्तर आश्चर्यकारक होतं.
"मी अनेक गोष्टी हटके अंदाजात करते. मला सामान्य कामं करायला आवडत नाही, कारण ती फारचं कंटाळवाणी असतात, असं ती म्हणाली. परंतु आता प्रियांका काहीही बोलो, पण आयफामध्ये सामील न होण्याचं कारण आता समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement