Adipurush Petition in Delhi Court: 'आदिपुरुष' विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली; 'हे' आहे कारण
आदिपुरुषचा (Adipurush) वाद दिल्लीच्या तीस हजारी न्ययालयापर्यंत पोहचला. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली.
Adipurush Petition in Delhi Court: गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूकवर काही लोकांनी अक्षेप घेतला होता. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा रिलीज झाला होता. या टीझरला अनेकांनी ट्रोल केलं. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX वर आक्षेत घेतला. आदिपुरुषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्ययालयापर्यंत पोहचला. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली. 'आदिपुरुष'च्या रिलीजला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील सुनावणी तीस हजारी कोर्टाने 24 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
सुनावणी का पुढे ढकलण्यात आली?
दिवाणी न्यायाधीश अभिषेक कुमार हे सध्या रजेवर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही याचिका सुनावणी करण्या योग्य आहे की नाही यावर न्यायालय 24 ला नोव्हेंबरला विचार करणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये ज्या प्रकारे भगवान राम आणि हनुमानाचे चित्रण करण्यात आले आहे, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे याचिकाकर्ते वकील राज गौरव यांनी याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत काय म्हटलं आहे?
याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणासारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरूपाची छेडछाड करता येणार नाही. रामायण हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि आध्यात्मिक आणि धर्माचा भाग आहे. ते म्हणाले की, भगवान रामाची प्रतिमा शांत होती, तर आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमध्ये ते अत्याचारी, प्रतिशोधी आणि संतप्त व्यक्ती म्हणून दाखवले आहेत.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे.हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Adipurush: ओम राऊतनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; आदिपुरुषचं नवं पोस्टर रिलीज